मुलींच्या नावाने फेसबुक अकाऊंट बनवून शेकडो लोकांना गंडा

दिल्ली | मुलींच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट बनवून शेकडो जणांची फसवणूक करणाऱ्या एकाला एसटीएफच्या पथकाने ताब्यात घेतलंय. फ्रँक असं या ठगाचं नाव आहे तो मूळचा नायजेरियाचा रहिवाशी असल्याचं कळतंय. 

ग्रेटर नोएडामध्ये तो जागा बदलून राहात होता. तो दिल्लीला असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या गँगमध्ये काही भारतीय मुलीही असल्याची माहिती आहे. 

राजस्थानमधील मिठ्ठन ग्वाला यांना कमी किंमतीत डॉलर देण्याच्या बहाण्याने त्यांनी तब्बाल 1 लाख 55 हजार रुपये उकळले होते. याप्रकरणाचा छडा लावताना फ्रँक एसटीएफच्या हाताला लागला.