फखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट!
जोहान्सबर्ग | क्विंटन डीकॉकच्या फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानच्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. फकर जमानच्या रनआऊटचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. यामध्ये डिकॉक नॉन स्ट्रायकरच्या दिशेला बॉल थ्रो करण्याची सूचना करत आहे. त्याच दिशेनं हॅरीस रौफ पळत होता. डिकॉकने हा इशारा करताच फखर थोडा स्लो झाला. तो पाठीमागे वळून नॉन स्ट्रायकरच्या दिशेनं पाहात होता. त्याचवेळी तो पळत असलेल्या दिशेनं थ्रो आला आणि तो रनआऊट झाला.
याचदरम्यान, फकर जमान रनआऊट प्रकरणी क्विंटन डीकॉकला क्लिन चिट देण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई होणार नाही. मॅचच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज पाहिला आणि हा निर्णय घेतला आहे. ‘ESPN क्रिकइन्फो’ मध्ये छापलेल्या बातमीच्या आधारे अधिकाऱ्यांनी फखर जमानचा रनआऊट होत असतानाचा व्हिडीओ पाहिला आणि याबाबत निर्णय घेतला आहे. डी काॅकने जे काही केलं ती फेक फिल्डिंग नव्हती म्हणून त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
रविवारी झालेल्या सामन्यानंतर त्या व्हिडीओला परत परत बघण्यात आलं. आणि त्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला की, डीकाॅकने हे कृत्य हेतुपुरस्कृत केल नाहीये. पहिला रन पुर्ण होतो तोपर्यंत डीकाॅक नाॅन स्टाइकरच्या दिशेने थ्रो करण्याचा इशारा करत होता, असं त्यातून स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, चूकी माझी होती कारण मी हैंरिस रउफ कडे बघायला लागलो. मला वाटलं त्यांने उशिराने रन घेण्यास सुरुवात केली. म्हणून रनआऊट नको व्हायला. आता निर्णय पंचांच्या हातात आहे. मात्र, मला नाही वाटतं की यात डीकाॅकची काही चुकी असेल, असं फकर जमान म्हणाला.
थोडक्यात बातम्या –
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत!
“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”
करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ
आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह
आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.