बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

मुंबई | भारतीयांना सोनं खरेदी करण्याची मोठी आवड आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या उलाढालीविषयी रोज जाणून घेण्यास लोकांना आवडत असतं. सोनं खरेदीकडे लोकांचा जास्त भर असल्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडींमुळे सोमवारी भारतातील सोनं-चांदीच्या भावांमध्ये घसरण पहायला मिळाली होती. आता मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून प्रतिकिलो चांदीचा दर 63,345 रुपये इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पहायला मिळाली. भारतात बहुतांश सोने आयात केले जात असल्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडीचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरावर होतो.

दरम्यान, गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता. कोरोनामुळे सोन्या-चांदीच्या भावातही वाढ झाल्याची पहायला मिळाली होती. त्यामुळे भारतातही या घडामोडीचा परिणाम होऊन सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली.

थोडक्यात बातम्या –  

माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात- अमृता फडणवीस

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

छोट्या कियाराचा सोशल मीडियात धुमाकूळ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मोठी बातमी! किंग कोहली कर्णधारपदावरून होणार पायउतार?, ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयची नजर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More