Top News

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा काय आहे भाव

मुंबई | कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे.

बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.

मंगळवारी चांदीच्या दरात सहा हजार रुपये तर सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर, तर सोने ५१ हजार ९०० रुपयांवरून ५१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आलं.

महत्वाच्या बातम्या-

मुसळधार पावसाची शक्यता असल्याने कार्यालयांना सुट्टी देण्याचं मुंबई महानगरपालिकेचं आवाहन!

आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

‘ओबीसी आरक्षणास धक्का लावाल तर…’; OBC संघर्ष सेनेचा सरकारला इशारा

मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या