बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खोटं वय सांगून केलं प्रेम, अल्पवयीन मुलाचे शरिरसंबंध अन् पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली | एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती आवडली की ती व्यक्ती मिळवण्यासाठी काहीही करणारे अनेक जण आपण पाहतो. अशाचप्रकारे एका अल्पवयीन मुलाचे प्रेम जडले ते 36 वर्षाच्या महिलेवर. त्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी संबंधित मुलाने महिलेला आपलं वय देखील खोटं सांगितलं. मात्र त्यानंतर जे झालं ते अत्यंत धक्कादायक होतं.

संबंधित 36 वर्षाच्या महिलेला 15 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. नवऱ्यासोबत सतत भांडणं होत असल्याने महिला तिच्या पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत होती. यादरम्यान, महिलेची ओळख तिच्या मुलाच्या मित्रासोबत झाली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं वाढलं आणि प्रेमसंबंधांना सुरूवात झाली. प्रेमसंबंधांमध्ये असताना महिलेने त्या मुलाला त्याचं वय विचारलं. यावेळी आपण 17 वर्षांचा असल्याचं मुलाने सांगितलं.

प्रेमात असलेल्या या दोघांचं बोलणं प्रचंड वाढलं आणि काही महिन्यांमध्येच त्यांच्यात शरीरसंबंध ठेवण्याचं ठरलं. शरीरसंबंध ठेवत असताना महिला गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर महिलेला तिच्या प्रियकराबाबतची अत्यंत धक्कादायक बाब समजली.

दरम्यान, महिलेने हा सर्व प्रकार एका मुलाखतीत सांगितला आहे. गरोदर राहिल्यानंतर महिलेला आपला प्रियकर 17 नाही तर 14 वर्षाचा असल्याचं समजलं. यावरच हा प्रकार नाही थांबला. या प्रकारानंतर महिलेने एका अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली. संबंधित घटना ही अमेरिकेमधील असून मुलगा 15 वर्षांचा झाल्यावर महिला त्याच्यासोबत लग्न करु शकते.

थोडक्यात बातम्या-

1 जूननंतर महाराष्ट्रातील एवढे जिल्हे वगळून लॉकडाऊन उघडणार?; या मंत्र्याचं सूचक वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंची महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात; आज ‘या’ ठिकाणी देणार भेट

‘तेरी मिट्टी में मिल जावां…’; कोरोना योद्ध्यांसाठी जवानाने वाजवली मनमोहक धून, पाहा व्हिडीओ

ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब, म्हणून भाजपने… – चंद्रकांत पाटील

अल्पवयीन मुलीवर दोन महिने बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More