बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या कुटुंबीयांना मिळणार 50,000 रुपयांची आर्थिक मदत”

चंदीगड | कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलं आहे. या महामारीत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक लहान मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. त्यामुळे कोरोनानं तर मृत्यूचा तांडवच घातलेला पहायला मिळाला. अशातच आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाला मदतीची घोषणा पंजाब सरकारनं केली आहे.

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या कुटुंबीयांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकार उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केली आहे.

पंजाब राज्य सरकार अजून मृतांची यादी तयार करत आहे. या यादीच्या आधारावर ते पीडित कुटुंबांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे आता कोरोनानं मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दिलासा देणारी बातमी आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या बदलत्या रुपामुळे नागरिकांना तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आता नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सरकारकडून कोरोना निर्बंधाचे काटोकोरपणे पालन करण्याचे आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

“महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

‘मी तुमच्यासाठी कपडे घालत नाही’, ट्रोलर्सवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर दुसऱ्यांदा भडकले, जाणून घ्या नवे दर

पेट्रोलियम कंपन्यांचा सर्वसामान्यांना सलग दुसऱ्या दिवशी दिलासा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More