Lodha Brand l महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप (BJP) नेते मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या दोन मुलांमध्ये व्यावसायिक वाद (Business Dispute) निर्माण झाला असून हे प्रकरण आता थेट न्यायालयात (Court) पोहोचले आहे. ‘लोढा’ (Lodha) या ब्रँडच्या (Brand) नावाच्या वापरावरुन हे दोन सख्खे भाऊ, अभिषेक लोढा (Abhishek Lodha) आणि अभिनंदन लोढा आमने-सामने आले आहेत. या कौटुंबिक वादानंतर (Family Dispute) उद्योग जगतातील (Business World) आणखी एका प्रसिद्ध कुटुंबात फूट पडल्याचे बोलले जात आहे.
मोठ्या भावाची धाव थेट उच्च न्यायालयात (High Court) :
बीएसई-लिस्टेड (BSE-Listed) रिअल्टी फर्म (Realty Firm) मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे (Macrotech Developers) सीईओ (CEO) अभिषेक लोढा यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. त्यांनी आपल्या धाकट्या भावाला, अभिनंदन लोढा यांना, कौटुंबिक ‘लोढा’ हे नाव वापरण्यापासून रोखण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. तसेच, अभिषेक यांनी ५ हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची (Compensation) मागणीही केली आहे.
Lodha Brand l ‘लोढा’ ब्रँडवरून (Brand) वाद कशामुळे? :
हा वाद ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ (House of Abhinandan Lodha), जी अभिनंदन लोढा यांच्या ‘लोढा व्हेंचर्स’ची (Lodha Ventures) रिअल इस्टेट शाखा (Real Estate Arm) आहे, या नावाशी संबंधित आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्सने (Macrotech Developers) दावा केला आहे की, ती लोढा समूहाची (Lodha Group) प्रमुख कंपनी आहे. २०१५ पर्यंत लोढा समूहातील कंपन्यांनाच हे व्यापारचिन्ह (Trademark) वापरण्याचा अधिकार होता. २०१५ मध्ये अभिनंदन लोढा यांनी लोढा समूहापासून वेगळे होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्च २०१७ आणि नंतर २०२३ मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, २०२३ मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो आणि त्यातील अटी आपल्याला बंधनकारक नाहीत, असा दावा अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्सने केला आहे.
२७ जानेवारीला होणार पुढील सुनावणी :
या प्रकरणाची सुनावणी करताना एकलपीठाने (Single Bench) हा वाद दोन भावांमधील भांडणाशी संबंधित आहे का? अशी विचारणा अभिषेक यांच्या वकिलांकडे केली. त्याला सकारात्मक उत्तर देत अभिषेक आणि अभिनंदन यांच्यात ‘लोढा’ या व्यापारचिन्हावरून (Trademark) वाद सुरू असल्याचे अभिषेक यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जानेवारी रोजी ठेवली असून, त्यावेळी अंतरिम दिलासा (Interim Relief) देण्याच्या मागणीवर युक्तिवाद ऐकण्याचे स्पष्ट केले.
Lodha Brand l मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती
मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी एकूण ४३६ कोटींची चल-अचल संपत्ती (Movable and Immovable Assets) घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर जवळपास १८३ कोटींचे कर्ज (Loan) आहे. त्यांच्याकडे १२३ कोटी ३८ लाख ९८ हजार ५८८ रुपये इतकी वैयक्तिक संपत्ती, तर त्यांच्या पत्नी मंजुळा लोढा (Manjula Lodha) यांच्या नावावर १० कोटी २८ लाख ७५ हजार ३४० रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे १२५ कोटी ५४ लाख ४९ हजार ७०७ रुपयांची स्थावर मालमत्ता (Real Estate) आहे.
News Title : Family Feud Over ‘Lodha’ Brand: Mangalprabhat Lodha’s Sons in Court Battle