बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन पिळवटून टाकणारी घटना! 15 दिवस फक्त पाणी पिऊन काढले दिवस

लखनऊ | कोरोनाने अनेकांचा रोजगार हेरावून घेतला आहे. अशातच अलीगड येथे मनाला हेलवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील 6 जणांनी 15 दिवस फक्त पाणी पिऊन पोट भरलं. 15 दिवसांपासून भूकेने तपडफडत असलेल्या या कुटुंबाला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं असून अखेर यांना मदतीचा हात समोर आला आहे.

अलीगडच्या नगला मंदिर परिसरात राहणाऱ्या गुड्डा देवी यांचा पती बिजेंद्र कुमार यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर मोलमजुरी करून गुड्डादेवी त्यांच्या 5 मुलांचा सांभाळ करत होती. मात्र लाॅकडाऊनमुळे तिचा रोजगार हिरावला. तरी या महिलेने काही दिवस घर चालवलं. शेवट पैसे संपल्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे पैसे मागून मुलांचे पोट भरण्याचं काम केले. काही दिवसांनी लोकांनी मदत करण्यापासून नकार दिला.

गुड्डीदेवी यांच्या 5 मुलं असून सर्वात मोठा 20 वर्षीय मुलगा आईची नोकरी गेल्यानंतर मजुरी करून घर सांभाळत होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याचंही काम बंद झालं. अनेक दिवसांपासून गुड्डी देवी आणि तिची मुलं घराबाहेर दिसली नसल्याने लोकांनी सामाजिक संघटनांना फोन केला. संघटनेचे अध्यक्ष सुनील कुमार सदस्यांसह गुड्डी देवीच्या घरी पोहचले.

दरम्यान,  गुड्डी देवी आणि तिच्या मुलांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  या मुलांची अवस्था पाहिली तर त्याचा अंदाज लावता येऊ शकतो. सामाजिक संघटनांनी या कुटुंबाचे वास्तव समोर आणताच जिल्हा प्रशासन हादरलं त्यांनी तात्काळ या महिलेचे रेशन कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेची कहाणी समोर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मदत करणाऱ्यांनी गर्दी केली. सपाने या कुटुंबाला आर्थिक मदत केली तर अन्य एका संस्थेने दोन महिन्याचं रेशन कुटुंबाला दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! उर्वशी रौतेलाने मड बाथसाठी मोजले तब्बल ‘इतके’ पैसे

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट

मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंट्सवर ‘हे’ औषध प्रभावी, संशोधकांचा दावा

खासदारकी मागायला मी भाजपकडे गेलो नव्हतो- संभाजीराजे भोसले

अभिमानास्पद! जागतिक पातळीवर पुण्याची उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More