बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन!

मुंबई | बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या संदर्भात माहिती देत अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना, असं ट्विट अशोक पंडित यांनी केलंय.

बिक्रमजीत कंवरपाल 2002 साली मेजरच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पेज 3, रॉकेट सिंग, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि गाझी अॅटॅकसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

दरम्यान, बिक्रमजीत यांना अभिनयाची आवड असल्यानं सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाने उद्धवस्त केला नवदाम्पत्याचा संसार; अवघ्या तीन दिवसात नवरदेवाला कोरोनाने गाठलं

‘…तर आज ही वेळ ओढावली नसती’; अजित पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

#सकारात्मक_बातमी | हृदयात बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बाळाने कोरोनाला केलं चितपट

“महाराष्ट्र लढवय्या, महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही”

“कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झालेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More