बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध अभिनेता बोमन इरानी यांच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई | बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांच्या आईचं निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. बोमन यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

बोमन इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं की, ‘आईनं झोपेतच अखेरचा श्वास घेतला. ती 94 वर्षांची होती. वयाच्या 32व्या वर्षापासून तिनं माझ्यासाठी आई आणि वडील दोघांचीही कर्तव्ये पार पाडली. ती अतिशय उत्साही आणि हसमुख होती’

पुढं बोमन यांनी लिहिलं की, जेव्हा मी एखाद्या चित्रपटामध्ये काम करायला जायचो तेव्हा ती अनेक गोष्टींचा सल्ला देत असे. ती नेहमी म्हणायची पॉपकॉर्न आणायला विसरु नकोस. तिला गाणी फार आवडायची. याशिवाय एखाद्या गोष्टीबाबत तिला काही शंका असेल तर ती त्याच्याबद्दलची माहिती विकीपिडीया आणि आयएमडीबीवर चेक करायची.

दरम्यान, आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयामुळे बोमन यांनी बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रवासामागे त्यांच्या आई हे त्यांचे प्रेरणास्थान होते. यापूर्वीच्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Boman Irani (@boman_irani)

थोडक्यात बातम्या – 

शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात

घरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा!

“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More