बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘फ्रेंड्स’ वेबसिरीजमधील ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचं दु:खद निधन

नवी दिल्ली | मागील दोन दशकापासून आपली जादू टिकवून ठेवणारी मालिका म्हणजे फ्रेण्ड्स. 1994 मध्ये सुरू झालेली ही अमेरीकन सिरीज प्रत्येक देशात आपली म्हणून स्विकारली गेली. मात्र आता याच मालिकेसंदर्भात एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. मालिकेतील एका महत्त्वाच्या कलाकाराचं आज सकाळी दु:खद निधन झालं आहे.

फ्रेण्ड्स मालिकेत दाखवला जाणारा सेन्ट्रल पार्क कॅफेचा मॅनेजर म्हणजेच गंथरची भुमिका निभावणाऱ्या कलाकाराचं निधन झालं आहे. जेम्स मायकल टेलर हे त्याचं खरं नाव आहे. तो 2018 पासून कॅन्सर या दुर्धर आजाराशी लढत होता. मात्र शेवटी त्याची झुंज अपयशी ठरली आणि आज पहाटेच जेम्स मायकलचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

फ्रेण्ड्स मालिकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून जेम्सला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या फ्रेण्ड्स- द रियुनियन मध्ये तो त्याच्या तब्येतीमुळे प्रत्यक्ष हजर राहू शकला नव्हता. मात्र तो झुमवरून सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना “फ्रेण्ड्स या मालिकेत काम केलेली 10 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते”, असं सांगितलं होतं.

फ्रेण्ड्स ही मालिका 1994 मध्ये टेलिव्हिजनवरील मालिका म्हणून सुरू झाली होती. नंतर मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून ती नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित करण्यात आली. ही मालिका आजही तरूणांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. मालिका सुरु झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष सुरू होती. आत्तापर्यंत मालिकेेचे 10 सिझन निघाले असून यावर्षीच्या मे महिन्यात फ्रेण्ड्स- दि रियूनियन या सीझनमध्ये पुन्हा सर्व कलाकार एकत्र आले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Friends (@friends)

 

थोडक्यात बातम्या-

…अन् सगळेच भारतीय खेळाडू बसले गुडघ्यावर! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

अनन्या पांडे हाजिर हो!, ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या अडचणी संपता संपेना

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More