प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

मुंबई | प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं आज पहाटे निधन झालं. ते 66 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते.

अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More