मोठी बातमी! राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई | राज्यात एकिकडे महापालिका आणि स्थानिक निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे तर दुसरीकडे पक्षांतराचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठ्या प्रमाणात सिनेकलाकारांचं इनकमिंग सुरू आहे.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री असावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात असावरी जोशी यांचा प्रवेश सोहळा पार पडला आहे. असावरी जोशी यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्याच वर्षी असावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला होता. साधारण एक वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थिती असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, असावरी जोशी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली असताना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. असावरी जोशी यांनी प्रोयोगिक नाटकांसह अनेक मराठी मालिका व चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या असून त्या सध्या स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत, तेच वकिली करत आहेत”
संजय राऊतांच्या टीकेला अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
“अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळेच…”
“…मग नवाब मलिक तुरूंगात असताना पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का नाही दाखवली? “
कोरोनाच्या XE व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांचा धक्कादायक दावा, म्हणाले…
Comments are closed.