Top News महाराष्ट्र मुंबई

प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा बाथटबमध्ये सापडला मृतदेह

मुंबई | आर्टिस्ट राम इंद्रनील कामत याचं निधन झालं आहे. राम इंद्रनील कामत त्याच्या मुंबई माटुंगा येथील घरातील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला.

ही आत्महत्येची केस असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राम इंद्रनील कामतच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

राम इंद्रनील कामत बुधवारी दुपारी तीन वाजता बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत करण्यात आलं.

लिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. रामने आपल्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही या घटनेसाठी जबाबदार ठरवलेलं नाही. पोलीस राम इंद्रनीलच्या कुटुंबियांची चौकशी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना वाहिली आदरांजली

देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये ‘या’ शहराची बाजी; मुंबई-पुण्याचा नंबर कितवा?

मोबाईल बनवणारी ‘ही’ मोठी कंपनी सर्व व्यवसाय भारतात स्थलांतर करण्याच्या तयारीत!

‘नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने…..’; कंगणाचं दीपिका पादुकोणवर टीकास्त्र

भारतात पाहिजे तिथे नोकरी शोधण्यासाठी मदत; गुगलकडून ‘हे’ खास अ‌ॅप लाँच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या