फुलराणीच्या भूमिकेत दिसणार बॉलिवुडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या!
मुंबई | भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. तिच्यावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. सायनाची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती शेअर केली आहे. परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केलं आहे. 26 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
परिणीतीने सायना नेहवालच्या बायोपिकची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करताना परिणीती म्हणाली की, 26 मार्च रोजी थिएटरमध्ये सायना.’ ते शीर्षक आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एक हात दिसत आहे आणि त्यावर शटलकॉकच्या आकारात ‘सायना’ असं लिहिलेलं दिसत आहे. पोस्टरमध्ये दिसलेल्या हातावर तिरंगा बँड आहे. त्यासोबत ‘मार दूंगी’ असंही कॅप्शन दिसत आहे.
परिणीती चोप्राने सायना नेहवालच्या बायोपिकसाठीस अथक परिश्रम घेतले आहेत. परिणीतीने बॅडमिंटन कोर्टातही चित्रपटाच्या व्यक्तिरेखेला न्याय मिळावा म्हणून कसून सराव केला आहे. परिणीती या भूमिकेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहे. परिणीतीचा अभिनय प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो हे चित्रपट प्रदर्क्षित झाल्यावर समजेल .
दरम्यान, अभिनेता मानव कौल सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंदच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय परेश रावलदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी अभिनेत्री श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी साइना केलं गेलं होतं पण नंतर हा चित्रपट परिणीती चोप्राकडे गेला. परिणीतीच्या चित्रपटातील भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
अर्थसंकल्पात 35 हजार कोटींची तरतूद कोरोनाच्या लसीसाठी 250 रुपये का?- पृथ्वीराज चव्हा
धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, हा निर्णय बसणार चेेन्नईच्या जिव्हारी?
धक्कादायक! सातवीतल्या मुलीने गळफास घेत संपवलं आपलं जीवन
डुकराचा बड्डे! या चिमुकलीची कल्पनाशक्ती पाहून सोशल मीडियावर सारेच हैराण, पाहा व्हिडीओ
बाप की सैतान?, ब्लेडने गळा कापून पित्याने केली आपल्या चिमुकलीची हत्या
Comments are closed.