बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ प्रसिद्ध कंपनीचे फोन आजपासून होणार बंद, वाचा सविस्तर

मुंबई | ब्लॅकबेरी (Blackberry) या कंपनीचे मोबाईल फोन्स तर सर्वांनाच माहित असतील. काही दिवसांपूर्वी या फोन्सची तरूणांमध्ये विशेष क्रेझ होती. मात्र, आता हे फोन्स लवकरच बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लॅकबेरी कंपनीचे QWERTY किपॅडवाले फोन आजपासून बंद होणार आहेत.

कंपनीने त्यांचे लोकप्रिय QWERTY किपॅड फोन बनविणे काही वर्षांपूर्वी बंद केले आहे. परंतु डिव्हाईसला सॉफ्टरवेअर सपोर्ट असल्याने हे फोन वापरता येत होते. मात्र, आता कंपनीने 2022 या वर्षापासून क्लासिक ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 सपोर्टेड स्मार्टफोनचा सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.

आजपासून या फोनच्या कॉल, सेल्युलर डाटा, एसएमएस आणि इमरजन्सी यासांरख्या सेवा बंद होणार आहेत. Blackberry 7.1 OS आणि Blackberry 10 सॉफ्टवेअर Blackberry PlayBook OS 2.1 आणि पूर्वीच्या व्हर्जनसाठी लेगेसी सेवा 4 जानेवारीनंतर बंद होणार आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

दरम्यान, ब्लॅकबेरीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने 2020 मध्ये या फोनचं उत्पादन बंद करणार असल्याचं जाहीर केलं होतं. 2022 मध्ये या फोनची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र, अँड्रॉइडवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी स्मार्टफोन्सची सेवा अजूनही सुरु राहणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण अजित पवारांना मोठा धक्का

‘महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही’; अजित पवार संतापले

Omicron नंतर ‘या’ नव्या व्हेरियंटचा शोध, ओमिक्रॉन, कोरोनापेक्षाही भयावह

Corona: केजरीवालांना कोरोना होताच दिल्लीत केली ‘ही’ मोठी घोषणा

अंगावर काटा आणणारा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा व्हिडीओm

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More