पुणे | शहरातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाचा मृत्यू झालाय. मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे यांचा मृत्यू झाला असून त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.
15 डिसेंबर रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचं सकाळी निधन झालंय.
रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ही गोळी त्यांच्या शरीरातून काढून टाकण्यात आली. त्यांनंतर त्यांना आयसीयूमध्ये देखील हलवण्यात आलं होतं.
मिलिंद मराठे हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडले होते. आर्थिक समस्येच्या तणावातून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
थोडक्यात बातम्या-
कोरोना हा महासाथीचा शेवटचा आजार नाही- WHO
कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही- राजनाथ सिंह
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस
‘गो कोरोना गो’ नंतर रामदास आठवलेंनी तयार केलं नवं स्लोगन!
“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”