मनोरंजन

या प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय प्रभासशी लग्न!

मुंबई | बाहुबली फेम प्रभास सध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. मात्र, प्रभास लग्न केव्हा करणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांच्या अफेअर्सच्या चर्चा खूप रंगल्या. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हिला प्रभासशी लग्न करण्याची इच्छा आहे.

काजल अग्रवालने  ‘फीट अप विथ द स्टार्स’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिला लग्नाविषयी विचारण्यात आले. मी लवकरच लग्न करणार असल्याचं तिनं सांगितलं आहे. तसेच मला प्रभासशी लग्न करायला आवडेल, असं तिनं म्हटलं आहे.

किल, हुक अप आणि मॅरी’ या तीन गोष्टी तू कोणत्या तीन अभिनेत्यांसोबत करशील असं तिला विचारण्यात आलं होतं. यावर, राम चरण- कील, ज्युनिअर एनटीआर- हुक अप आणि प्रभासशी लग्न करेन, असं काजल म्हणाली आहे.

माझा पती आध्यात्मिक असावा असं काजल म्हणाली आहे. मी स्वत: खूप आध्यात्मिक आहे. मी नेहमी शंकराची मूर्ती पर्समध्ये ठेवत असते, असं तिनं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या