बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे | पुण्यातील उरुळी कांचन येथील गारवा हाॅटेलच्या मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. संबंधित हाॅटेल मालकावर एका व्यक्तीने तलवारीने सपासप वार केले होते. हाॅटेल मालकाचं नाव रामदास आखाडे असं आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास रामदास हाॅटेल बाहेर खुर्चीवर फोनवर बोलत होते. एवढ्यातच एक व्यक्ती चालत त्यांच्या जवळ आली आणि क्षणात टी-शर्ट खाली लपवलेली तलवार काढून रामदास यांच्यावर सपासप वार करु लागली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या रामदास यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जहांगीर रुग्णालयात रामदास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोक्यावर जब्बर वार झाल्याने आखाडे यांची प्रकृती गंभीर झाली होती. ही संपूर्ण घटना भर वर्दळीच्या ठिकाऩी झाल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

दरम्यान, हा हल्ला कोणत्या कारणावरुन करण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे आरोपीचा चेहरा समोर आला आहे. तरी अद्याप आरोपीला शोधण्यात यश आलं नसून पोलीस कसून शोध घेत आहेत. तसेच या घटनेचा अधिक तपास देखील सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

“लोकांनी पुढे येऊन राज कुंद्रासारख्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे”

द्रविडचा एक मेसेज अन् चाहरनं सामना पालटवला, वाचा नेमकं काय सांगितलं?

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More