बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं आज निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. अखेर प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

हरेंद्र जाधव यांनी तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, आता तरी देवा मला पावशील का, माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु, पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांनी पहिलं गाणं लिहिलं होतं. मात्र, हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली होती.

हरेंद्र जाधव यांनी पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा… तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा… माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू… हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं… आता तरी देवा मला पावशील का?, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी गाणी लिहीली आहेत. हरेंद्र जाधव यांनी आतापर्यंत दहा हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे, घाबरून जाऊ नका- नरेंद्र मोदी

‘वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत’; ‘या’ आमदाराने रेमडेसिविरसाठी 90 लाखांची FD मोडली

‘मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये’; त्या व्हायरल मेसेजवर सरकारने दिलं स्पष्टीकरण

लस घेतल्यानंतर कोरोनाचा कितपत संसर्ग होऊ शकतो?; समोर आली महत्वाची माहिती

“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची देशाला गरज”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More