बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्यासोबत त्याला शारिरीक संबंध ठेवायचे होते…’; प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

मुंबई | स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असली तरी सध्या मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलर आणि निर्मात्यांवर अनेक आरोप होताना दिसत आहेत.

मालिकेत सुर्याच्या आईची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेचे निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली होती. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलर विरोधात तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री स्वाती भाडवेने मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलरवर गंभीर आरोप करत त्याच्या विरोधात पोलीसात धाव घेतली आहे. प्रोडक्शन कंट्रोलरने शरीरसुखाची मागणी केली असल्याचा खळबळजनक आरोप अभिनेत्रीने केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वातीने हा खुलासा केला आहे.

स्वाती मालिकेत नंदीता पाटकरची बॉडी डबल म्हणुन काम करते. यावेळी प्रोडक्शन कंट्रोलरने शरीरसुखाची मागणी केली आणि बदल्यात काम देईन असं सांगितलं. पण ही गोष्ट तिला मान्य नसल्यामुळे तिने नकार दिला. हा प्रकार खूप धक्कादायक असल्याचा खुलासाही स्वातीने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी सरकारची भन्नाट योजना; मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख!

जंगलाच्या राजावर झेब्रा पडला भारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

वोडाफोन-आयडियाची धूर्त खेळी, लक्षात येताच जिओनं केला मोठा भांडाफोड

भाजपच्या बैठकीत तुफान राडा; कार्यकर्त्यांची लाथाबुक्क्यांनी मारहाण

‘…तो शुद्ध हलकटपणा होता’; नितीन राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकर संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More