पुणे | मराठीतील प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज निधन झालं आहे. आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
अवघ्या वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये सकाळी 9.30 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नरेंद्र भिडे यांनी बायोस्कोप, रानभूल, पेईंग घोस्ट, देऊळ बंद या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. शिवाय हम्पी, उबंटू, पुष्पक विमान, 66 सदाशिव या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिलंय.
मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी कलाकार म्हणून भूमिकाही केली होती.
थोडक्यात बातम्या-
महिलेला पार्टीला बोलवून तिच्यासमोर नग्ननृत्य; पुण्यातील विकृत घटनेनं खळबळ
रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल- बच्चू कडू
‘आम्ही शिर्डीत जाणारच…’; नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा
“जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलंय, ते सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत”
धक्कादायक! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन!