बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

नवी दिल्ली | आज तक या वृत्तवाहिनीमध्ये वृत्त निवेदनाचं काम करणाऱ्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज कोरोनामुळे दु:खद निधन झालं आहे.

सुधीर चौधरी यांनी यासंबंधी ट्विट करत रोहित सरदाना यांच्या निधनाची बातमी समोर आणली आहे. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. परंतु, नंतर तब्येत खराब झाल्याने त्यांना दिल्लीच्या मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. आज सकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दिल्ली येथे दुर्दैवी मृत्यू झाला.

काल रात्री त्यांची तब्येत स्थिर होती पण त्यानंतर सकाळी 4 वाजता अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि आज सकाळी त्यांचं हृदयविकाराचा झटका आल्याने दु:खद निधन झालं.

 

थोडक्यात बातम्या – 

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More