26 जानेवारीला पथसंचलनात दिसणार महाराष्ट्राचा अनोखा चित्ररथ! पाहा फोटो
नवी दिल्ली | 26 जानेवारी रोजी देश भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथ येथे देशाच्या सामर्थ्याचं जगाला दर्शन घडवलं जातं. या प्रजासत्ताक दिनी देशातील घटक राज्य आपापल्या चित्ररथांच्या माध्यमातून विविध कलाकृती सादर करतात.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला एक वेगळा इतिहास लाभला आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथ येथील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील ‘जैवविविधता मानके’ विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे.
दिल्लीच्या कँटोन्मेट परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्णत्वास येत आहे. यावर्षी महाराष्ट्रानं एका वैशिष्ट्यपुर्ण विषयाची निवड केल्यानं सध्या राज्याच्या रथाची चर्चा होत आहे.
महाराष्ट्राचा शेकरू हा राज्यप्राणी, ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू यासह राज्यातील जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
राज्य शासनाने प्राणी, पक्षी व अन्य जीवांसाठी राखीव ठेवलेल्या अभयारण्यातील दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीही चित्ररथावर दर्शविण्यात आल्या. परिणामी सध्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची वाट सर्वजण पाहत आहेत.
दरम्यान, चित्ररथाचं काम आता पुर्ण होत आलं आहे. राज्याच्या चित्ररथाला अनेक पुरस्कारांनी यापुर्वी सन्मानित करण्यात आलं आहे. परिणामी यंदाच्या पथसंचलनात राज्याच्या चित्ररथ देशवासियांचं लक्ष वेधून घेणार आहे.
थोडक्यात बातम्या –
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण
KL Rahul ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; रक्कम ऐकून थक्क व्हाल!
“…म्हणून भाजपला दु:ख होतंय”, जयंत पाटलांचा खोचक टोला
“नाना पटोले मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत, त्यांच्यामुळं सोनिया गांधी…”
Comments are closed.