बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध राजन-साजन जोडीतील पद्मभूषण राजन मिश्रा यांचं कोरोनानं निधन

नवी दिल्ली | प्रसिद्ध गीतकार जोडी राजन-साजनमधील पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काही वेळापूर्वी त्यांचं दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं.

राजन मिश्रा यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच काही वेळा पूर्वी त्यांना ऑक्सीजन बेड मिळावा यासाठी ट्विटरवर काही लोकांनी मागणी केली होती त्यावर संजीव गुप्ता या आयएएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून त्यांना सेंट स्टीफन्स रुग्णालयात बेड मिळवून दिला.

उपचारादरम्यान पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झालं आहे. देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच अनेक दिग्गजांना त्यामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आज पंडित राजन मिश्रा यांच्या मृत्यूने कला व संगीत क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गीतकार पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून लता मंगेशकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी ट्वीट करून तसेच फेसबुक वर पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

थोडक्यात बातम्या –

ॲाफिसमध्ये मास्क काढून जोरात खोकला, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरूचा विजय रथ रोखला, चेन्नईचा 69 धावांनी विजय

ज्याच्यासाठी पैसा जमवला तोच राहिला नाही; आई बापानं उचललं अभिमानास्पद पाऊल

…म्हणून पोलीस स्टेशनमध्येच नवरीला लागली हळद, कारण ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

एका रेमडेसिवीरची किंमत ऐकून हैराण व्हाल, पुणे गुन्हे शाखेकडून चौघांना अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More