मुंबई | बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध गायक आणि संगितकार अदनान सामीचे(Adnan sami) इंस्टाग्रामवर अनेक चाहते आहेत. त्यांच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्रामवरील(Instagram) सर्व पोस्ट काढून टाकल्या. त्याने फक्त एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर GOOD BYE असं लिहीलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
यावर त्याचे चाहते त्याला कमेंट करून करून नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच अनेक चाहते त्याला इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट काढून का टाकल्या?, असा प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. असे असले तरी अदनान सामीने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
एका नेटकऱ्याने अदनान सामीचं नवीन गाणं आलं आहे आणि त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी अदनान सामीने असं केलं आहे, अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहते इंस्टाग्रामवर सामीने पुन्हा पोस्ट कराव्यात अशी मागणी करत आहेत. त्यामुळे नेमकं सामीने असं का केलं? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
अदनान सामी यापूर्वी इंस्टाग्रामवर नेहमी सक्रीय असायचा. त्याचे इंस्टाग्रामवर 672 हजार फॉलोअर्स आहेत. फिटनेसबाबत लोक त्याला कमेंट करून विचारत असे अनेकदा त्याचे अपडेट तो चाहत्यांना देत असे. पण आता अचानक त्याने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलिट केल्याने नाराजी व्यकत केली जात आहे.
थोडक्यात बातम्या
‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर
“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”
“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”
नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई
शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले
Comments are closed.