बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या वादात जावेद अख्तरांची उडी, म्हणाले…

नवी दिल्ली | केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधीच्या सल्ल्यावरून सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या मुद्यावरून देशात अनेक राजकीय वाद-प्रतिवाद घडून आले. आता वादात आता प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे देशातील राजकीय वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या माफीच्या दोन विनंत्या 1911 आणि 1913 रोजी करण्यात आल्या होत्या. तेव्हा सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. त्यावेळी गांधीची दक्षिण आफ्रिकेत होते. महात्मा गांधी यांनी 1915 मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे सावरकरांनी गांधीजींमुळे ब्रिटिशांकडे माफी मागितली, हे सर्व खोटं आहे, असं जावेद अख्तर म्हणाले.

सावरकरांनी गांधींनी सांगितल्यानं ब्रिटिशांकडे माफी मागितली हा दावा करून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गांधींकडून सावरकरांसाठी थोडी प्रतिष्ठा मिळवू पाहत आहेत. मात्र, याचा राजकारणात काहीही उपयोग होणार नाही, असं देखील जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याच मुद्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिेली होती. त्यानंतर वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. या देशाला 5 हजार वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे त्यामुळे देशातील कुठलीही व्यक्ती राष्ट्रपिता होऊ शकत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की, गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत, अशी प्रतिक्रिया रणजित सावरकर यांनी दिली होती.

पाहा ट्विट

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात चौकशी होणार

“मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, त्याचं मला फार दु:ख वाटत नाही”

“सावरकर देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकूटमणी, पण भाजप नेत्यांनी…”

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More