मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला तीन महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. यामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तर सुशांतच्या एका चाहत्याने त्याला एका वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
बंगालमध्ये राहणाऱ्या सुशांतच्या या चाहत्याने त्याचा मेणाचा पुतळा तयार केला आहे. सुशांतच्या या मेणाच्या पुतळ्याचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. सुकांतो रॉय असं या चाहत्याचं नाव आहे.
सुकांतो सुशांतचा खूप मोठा चाहता आहे. सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच तो फार दुःखी झाला. आपल्या लाडक्या सुशांतला वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याने हा मेणाचा पुतळा तयार केला आहे.
सुकांतो यांच्या सांगण्यानुसार, “लंडनच्या म्युझियममध्ये देशातील अनेकांचे मेणाचे पुतळे आहेत. मात्र सुशांतसारख्या गुणी अभिनेत्याचा पुतळा नाही. यासाठीच सुशांतबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी हा पुतळा तयार केला आहे. हा पुतळा मी सुशांतच्या कुटुंबीयांकडे सोपवणार आहे.”
महत्वाच्या बातम्या-
देशवासियांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलं ‘हे’ गिफ्ट!
संभाजीराजे, पोलीस भरतीवर आक्षेप घेऊ नका- प्रकाश शेंडगे
पहाटे 6 वाजता अजित पवार पुणे मेट्रो पाहणीसाठी; तिकीट काढत केला मेट्रोेने प्रवास
पहिल्यांदाच राज्यसभेत निवडून गेलेल्या भाजप खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू!
हरसिमरत कौर यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; या मंत्र्याकडे सोपवला अतिरिक्त कार्यभार
Comments are closed.