…म्हणून चाहता बनला ‘बाहुबली’, तमन्नावर फेकला बूट!

हैदराबाद | बाहुबलीफेम अभिनेत्री तमन्ना भाटियाला तिच्याच एका चाहत्याने बूट फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडलाय. तमन्नाचे चित्रपट न आवडल्याने त्याने हा प्रकार केल्याचं कळतंय. 

तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनासाठी आली होती. त्यावेळी आरोपी करीमुल्लाने तिला बूट फेकून मारला. सुदैवाने सुरक्षारक्षकांच्या गराड्यामुळे हा बूट तिला लागला नाही. 

पोलिसांनी करिमुल्लाला ताब्यात घेतलंय. तमन्नाचा अलिकडच्या चित्रपटांमधील अभिनय सुमार होता, त्यामुळे निराश झाल्याने मी हा प्रकार केला, असं करिमुल्लाचं म्हणणं आहे.