… अन् तिनं 72 कोटींची संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई| अनेकदा चाहते आपल्या आवडत्या व्यक्तीच्या वेडापायी अनेक गोष्टी करतात. कोणी आपल्या आवडत्या अभिनेता (Actor) अभिनेत्रीचा टॅटू काढत, कोणी आपल्या मुलांची नावं त्याच्या नावावरून ठेवतं, कोणी त्यांच्या नावाचं चक्क मंदिर देखील बनवत. नुकतंच अशाच एका अभिनेत्याच्या चाहतीच वेडं समोर आलं आहे. त्यामुळं खुद्द तो अभिनेता देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. नायक नही खलनायक हु मै हा डायलाॅग बोलल्यानंतर सगळ्यांनाच आठवण येते ती म्हणजे आपल्या मुन्नाभाईची अर्थाततच अभिनेता संजय दत्तची. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे संजय दत्त(Sanjay Dutt). घरातील असणाऱ्या राजकीय वारसामुळे अनेकदा संजू बाबाला ट्रोलदेखील केलं जातं.

एखादा फॅन जास्तीजास्त आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी काय करु शकतो. फार फार तर पैसे देऊन भेटणं, महागडे गिफ्ट देणं इथपर्यंत ठिक होतं. मात्र तुम्ही कधी तुमची आयुष्यभराची कमावलेली संपत्ती देण्याचा विचार करु शकता का?, आश्चर्य वाटतंय ना, पण असं घडलंय आपल्या संजू बाबासोबत ज्याची कल्पना त्याला स्वत:लादेखील नव्हती.

मुंबईत राहणाऱ्या निशी हरिश्चंद्र त्रिपाठी (Nishi Harishchandra Tripathi) यांनी मृत्यूपूर्वी त्यांची सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर केलीयं. यामध्ये 10 कोटींच्या घराचाही समावेश आहे. निशी तिच्या आई आणि कुटुंबासह मुंबईत राहत होती. संजय दत्तला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तोही थक्क झाला. एकेदिवशी संजय दत्तला पोलिसांचा फोन आला, त्यावेळी त्याला पोलिसांनी सांगितलं की, निशी नावाच्या एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ती तुमची मोठी फॅन होती. त्यामुळंच तिनं तिची आयुष्यभराची सगळी संपत्ती तुमच्या नावावर केली आहे. हे ऐकून संजयला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता.

निशीच्या या निर्णयानं त्याचं कुटुंबीयही आश्चर्यचकित झालं होतं. त्यांना देखील या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती निशीच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्युपत्राचं (Death certificate) जेव्हा वाचन करण्यात आलं, तेव्हा असं समजल की, बँकेच्या लाॅकरमधील दाग-दागिने आणि रक्कम मिळून एकून 72 कोटींची संपत्ती तिनं संजय दत्तच्या नावावर केली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर संजय दत्तला धक्का बसला आणि तो भावूकही झाला. मात्र निशीनं त्याच्या नावावर केलेल्या संपत्तीवर संजय कोणत्याही प्रकारचा दावा करत नाहीयं. तीची सगळी संपत्ती तिच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी त्यांनं बॅंकेला पत्र देखील लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या