बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नातील ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात, पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या कलाविश्वात अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची धूम पहायला मिळत आहे. सगळीकडे त्यांच्याच लग्नाची चर्चा सुरु आहे. विकी आणि कतरिना लवकरच लग्नबंधनात अडकणार असून सध्या त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कतरिनाच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Vedio) होत आहे. या व्हिडीओनं अनेकांना संभ्रमात पाडलेलं दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कतरिनाचं लग्न होताना दिसत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चनही दिसत आहे. मात्र यामध्ये नवरा मुलगा विकी दिसत नसल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं. काहींना हा व्हिडीओ पाहून खरंच लग्न झालंय की नाही? असा प्रश्नही पडला. त्यामुळे कतरिना आणि विकीचे चाहते संभ्रमात पडले आहेत.

कतरिनाचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ लग्नातीलंच आहे. मात्र ते लग्न एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी आहे. सोशल मिडियावर धुमाकूळ घातलेल्या या व्हिडीओनं विकी आणि कतरिनाचे चाहते कोड्यात पडल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे हा व्हिडीओ अनेकवेळा शेअर केला जात आहे.

दरम्यान, विकी आणि कतरिनाची डेस्टिनेशन वेडिंग 7 ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान राजस्थानात होणार असून त्यामध्ये संगीत, मेहंदी असे सगळे विधी होणार आहेत. सवाई माधोपूरमध्ये हे लग्न होणार आहे. त्यामुळे तिथं देशविदेशातील सेलिब्रिटी येणार असल्याचं समजतंय.

पाहा व्हिडीओ –

 

 

View this post on Instagram

 

A post shared by B O L L Y W O O D (@filmystan123)

थोडक्यात बातम्या – 

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी केंद्रीय मंत्री – नारायण राणे

“700 आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैतच जबाबदार”

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्या!

लग्नात फोटो काढण्याची परवानगी नसतानाही विकी आणि कतरिनाचा पहिला फोटो व्हायरल

चैत्यभूमीवर समीर वानखेडेंच्याविरोधात घोषणबाजी, नवाब मलिक म्हणाले..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More