मनोरंजन

केबीसीमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने नेटकरी संतापले

मुंबई |  बीग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ या शो ला प्रेक्षक डोक्यावर घेताना दिसून येतात. मात्र आता हा शो एका वादात अडकला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा वाद पेटला आहे.

गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले.
1. महाराणा प्रताप  2. राणा सांगा  3. महाराजा रणजीत सिंह  4. शिवाजी.

बिग बींनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांना आता चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेत. औरंगजेबाच्या नावाखाली मुघलसम्राट लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का? असे प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल बिग बींनी माफी मागावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. मात्र याप्रकरणी आतापर्यंत अमिताभ बच्चन यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या