बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यापासून अनेक गोष्टींचा उलगडा झालेला पाहायला मिळाला. अनेकांनी पुढे येत राज कुंद्रावर आरोप केले आहे. याप्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री गहना वशिष्ठही चांगलीच चर्चेत आलेली पाहायला मिळाली. अशातच आता पुन्हा एकदा गहना चर्चेता विषय ठरत आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गहनानं इन्स्टाग्रामवर न्यूड लाईव्ह केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या लाईव्ह सेशनमध्ये गहनानं म्हटलं की, मी सध्या तुमच्यासमोर न्यूड बसलेली आहे. यामध्ये मी तुम्हाला पाॅर्नस्टार दिसत आहे का?, मी असभ्य दिसत असल्यास मला सांगा, असेही प्रश्न यावेळी गहनानं विचारले.

पुढे गहना वशिष्ठ म्हणते की, माझा सांगण्याचा हेतु हा आहे की, मी आत्ता तुमच्यासमोर न्यूड बसलेली आहे तरीही तुम्ही याला अश्लील म्हणत नाहीत. मात्र माझ्या बाकीच्या व्हिडीओमध्ये मी कपडे घातले असूनही तुम्ही त्याला अश्लील कॅटेगरीमध्ये मोजता. ही गोष्ट चुकीची आहे.

दरम्यान, गहनाचा हा लाईव्ह सेशन चांगलाच चर्चेत आला आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रावर हा सेव्हदेखील केला आहे. या पहिलेही गहनाला अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याचेच धागेदोरे लागत आता पोलिसांना राज कुंद्रा सापडला आहे. राज कुंद्रा प्रकरणाच आणखी काय गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हि़डीओ

थोडक्यात बातम्या –

“मोदीजींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागलेत”

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; वाचा काय आहेत नियम

पुणे ग्रामीणमध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव; नवे बाधित रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; ठाकरे सरकारच्या कामावर राहुल गांधी समाधानी

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बैठक, बंद दाराआड झाली चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More