SBI बॅंकेची भन्नाट योजना! महिन्याला घर बसल्या मिळतील पैसे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आजकालच्या जगात एका नोकरीसोबत किंवा व्यवसायासोबत पैसे मिळवण्यासाठी दुसरा इनकम स्रोत उपलब्ध असणं गरजेचं झालं आहे. अशातच तुम्ही SBI बॅंकेत गुंतवणूक करून महिन्याला पैसे मिळवू शकता. जाणून घेऊयात SBI बॅंकेच्या या स्कीमबद्दल.

SBI च्या या स्कीमचं नाव ‘SBI वार्षिक ठेव योजना'(Annuity Deposite Plan)आहे. या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवणूक केले तर तुम्हाला तुमच्या मुळ रक्कमेसह व्याज देखील मिळते.

यासाठी ग्राहकांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला वार्षिकी भरावी लागेल. त्यानुसार तुम्हाला पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला हे पैस मिळू शकतात.

या योजनेसाठी तुम्ही दोन वर्षांसाठी तसेच साठ, चौऱ्याऐंशी किंवा एकशेवीस महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकता. तर कमीत कमी महिन्याला एक हजार रूपये गुंतवावे लागतील.

या योजनेनुसार ग्राहकांना एफडी आणि मुदत ठेवीच्या समान व्याजाचा लाभ देखील मिळणार आहे. तसेच बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून अर्ज करू शकता. तसेच या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही SBI च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-