दिग्दर्शक फराह खानला मातृशोक, मेनका इराणी यांचं निधन

Farah Khan Mother Dies | प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान ही अनेक कारणाने चर्चेत असते. मात्र आता फराह खानवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फराह खानच्या आईचं निधन (Farah Khan Mother Dies) झालं आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. फराह खानची आई मेनका इराणी यांचं वयाच्या 79 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. मेनका इराणी यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून त्या आजारी होत्या.

फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानच्या आईचं निधन

फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खान यांची आई मेनका खान यांचं निधन (Farah Khan Mother Dies) झालं आहे. मेनका इराणी दिर्घकाळ आजारी होत्या. त्यांना अनेकदा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मेनका इराणी यांच्यावर नानावाटी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. काही दिवसांआधी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. फराहचा भाऊ साजिद खान देखील दीर्घकाळ आजारी होता. रूग्णालयात त्यांना अनेकदा दाखल करण्यात आलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

गेल्या वेळी, मुंबईच्या नानावटी रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. उपचार आणि डिस्चार्ज झाल्यानंतर मेनका घरी परतल्यानंतर फराहने आईचा वाढदिवस साजरा केला होता.  12 जुलै रोजी फराह खानने आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

मेनका यांनी ‘या’ सिनेमात केलं होतं काम

आई मेनका इराणीच्या जाण्यानं फराह खान आणि साजिद खानसह संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मेनका इराणी या अभिनेत्री होत्या. 1963 साली बचपन या सिनेमान मेनका यांनी काम केलं होतं. हा चित्रपट सलीम खान यांनी लिहिला होता. (Farah Khan Mother Dies)

News Title – Farah Khan Mother Dies Bollywood Marathi News Update

महत्त्वाच्या बातम्या

अनेक महिने वापरताय एकच टूथब्रश?, मग ही बातमी वाचाच

‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’, पंकजा मुंडेंच्या वाढदिवशी झळकले बॅनर

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार?, विरोधकांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांनी दिलं प्रत्युत्तर

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत

‘काळ आला होता पण वेळ नाही’, पुरात अडकलेल्या तरुणाला बचाव पथकाने सुखरूप काढले बाहेर