मुंबई | मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे 7 मार्चला आयोध्येला जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू, असं समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांचे सुपुत्र फरहान आझमी यांनी म्हटलं आहे.
फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. इतकंच नाहीतर ठाकरे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही, अशी टीका फरहान आझमी यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या घोषणेनंतर फरहान आझमी यांनीही आपण अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे.
मी इशारा देतो, याला धमकी समजा किंवा काहीही समजा पण मला विनम्रपणे सांगायचंय की उद्धव ठाकरे 7 मार्चला आयोध्येला जाणार असतील तर मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार. तसेच माझ्या वडिलांना सोबत येण्याची विनंती करणार आहे, असं फरहान आझमी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, तुम्ही लोकांना धोका दिला. मोदींच्या नावे मतं मिळवली. अमित शाहांच्या भीतीने काँग्रेस-राष्ट्रवादीला रिकामं केलं आणि त्यांनाच तिकीट देऊन तुम्ही सरकार चालवत आहात. आम्ही त्याचं खंडण करतो. अयोध्या दौरा करुन तुम्ही मुस्लिम, दलित, अल्पसंख्याक, भारतीय आणि धर्मनिरपेक्ष हिंदूंना धमकावत आहात.
ट्रेंडिंग बातम्या-
“आता कुणी दादा, काकाला घाबरायची गरज नाही”
जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धाव
महत्वाच्या बातम्या-
“इस्रोनं जरी मदत केली तरी ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही”
“सुधीर मुनगंटीवार यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहेत”
काय सांगता!; ‘वन प्लस’च्या ‘या’ फोनवर तब्बल सात हजार रुपयांची सूट
Comments are closed.