आमदार संजय गायकवाडांकडून शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) हे सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत कारण सध्या त्यांची एक ऑडीओ क्पिल सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड हे एका शेतकऱ्याला शिविगाळ देताना दिसत आहेत. अनिल गंगित्रे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्यानं गायकवाड यांना उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात बोलायला फोन केला होता.

आता गायकवाड यांनी शेतकऱ्याला शिविगाळ केल्याचं कबूलही केलं आहे. स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाले की, मला मुंबई मंत्रालयातून फोन आला आणि सिंचन योजना संदर्भात चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत होता. त्यामुळं त्याला मी त्याच्याच भाषेत उत्तर दिलं.

मी सुद्धा एक खानदानी शेतकरी आहे. माझ्यासाठीही सिंचन प्रकल्प महत्वाचा आहे. त्यासाठी मी स्वत: बैठका घेतल्या आहेत. तसेच निधीही मंजूर झाला आहे,असंही गायकवाड म्हणाले आहेत.

परंतु सिंचन प्रकल्पाबद्दल चुकीची माहिती तो शेतकरी देत होता, त्यामुळं मी त्याला उत्तर दिलं असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या-