…म्हणून शेतकऱ्यानं बुजगावण्याऐवजी लावलं सनीचं पोस्टर!

हैदराबाद | पिकाचं नुकसान होऊ नये किंवा पक्षांची मालाची नासाडी करु नये यासाठी शेतकरी शेतात बुजगावणं लावतो, मात्र आंध्र प्रदेशमधील एका शेतकऱ्यानं चक्क सनी लिओनीचं पोस्टर लावलं आहे. 

ए. चेंचू रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानं सनी लिओनीचे बिकीनी घातलेले दोन बॅनर आपल्या शेताच्या बांधावर लावले आहेत. माझ्यावर जळू नका, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

माझ्या शेतमालाचं अनेकदा नुकसा झालं. त्यामुळे शेतमालाला कुणाची नजर लागू नये यासाठी सनीचे फोटो लावले आहे. येणारे जाणारे लोक शेतमालाकडे न पाहता सनीकडे पाहतील आणि शेतमालाचं रक्षण होईल, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.