बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; मराठवाड्याच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

हिंगोली | हिंगोली येथील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून थेट नक्षलवादी होण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सेनगावच्या ताकातोडा गावातील नामदेव पतंगे या शेतकऱ्याने नापिकी आणि दुष्काळ पडला असताना प्रशासनाकडून मिळणाऱ्या तोकड्या मदतीला कंटाळून मुख्यमंत्र्याकडे आता “नक्षलवादी होऊ द्या” अशी मागणी केली आहे.

पतंगे यांनी या पत्रामध्ये लिहिताना लाईनमेन आमच्यावर दादागिरी करत आहेत, न सांगताच लाईन कापत आहेत आणि तुमच्या बँक आम्हाला पीककर्ज देत नाहीत, तुम्ही सांगितलं की 5 एकर शेताला 20 हजारांची नुकसान भरपाई देऊ, पण तुमच्या प्रशासनानं आम्हाला 9 हजार देऊन आमची तोंडं गप्प केली. त्यामुळे, आता तुम्ही नक्षलवादी होण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

पिकेल ते विकेल असं मुख्यमंत्री सांगतात पण आमच्याकडे काही पिकलचं नाही तर विकायचं काय? असा प्रश्न पडला असल्याचं त्यांनी लिहलं आहे. तुमच्या प्रशासनाने आता अशी परिस्थिती आणली आहे की, नक्षलवादी होण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. त्यामुळे नक्षलवादी होण्यास परवानगी द्या असं नामदेव पतंगे सांगतात.

तुम्ही कर्जमाफी दिली पण अद्याप ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मी मांडलेली ही कैफियत एकट्याची नसून हजारो शेतकऱ्यांच्या वतीने मी हे बोलून दाखवत आहे असंही ते म्हणाले. शेवटी ओळख करून देताना त्यांनी तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी अशा प्रकारे करून दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”

साेशल मीडिया, ओटीटी, न्यूज पाेर्टल्सवर सरकारची असणार करडी नजर; वाचा नवी नियमावली

अभिमानास्पद! काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम; ‘या’ पक्षात केला प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More