बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांचा संताप अनावर; भररस्यात भाजप आमदाराचे कपडे फाडून केली मारहाण

चंदीगड | कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरूच आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. 4 महिने झालं आंदोलन सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. यामुळे शेतकरी संतापले आहे. शेतकऱ्यांच्या या संतापाचा सामना भाजप आमदार अरूण नारंग यांना करावा लागला.

पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या अरूण नारंग यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याचं कळतंय.

भाजप आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र, ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजप कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहोचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं.

अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर काढले. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजप आमदार आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलीस नारंग यांचा शेतकऱ्यांपासून बचाव करताना दिसत आहे. या व्हिडीओत शेतकरी आमदाराला शिव्या देताना आणि मारहाण करतानाही दिसत आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

सावधान!!! महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; आज तब्बल एवढ्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरारक सामना, असा झाला भारताचा विजय!

ठोकर खाके आदमी ठाकूर बनता है!; मराठमोळ्या शार्दुलचं विरुकडून कौतुक

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More