Top News शेती

बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या!

अमरावती | शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाची चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीये. शिवाय व्यापाऱ्यावर फसवणूकीचे आणि पोलिसांवर मारहाणीचे आरोपही करण्यात आले आहेत.

अशोक पांडुरंग भुयार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. यासंदर्भात अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक तसंच संत्र्याचे व्यापारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेतात एक व्यक्ती मृतावस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती. मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या कपड्यात एका पानाची चिठ्ठी सापडली. यामध्ये संत्र्याचे व्यापारी तसंच अंजनगाव पोलिसांकडून झालेली मारहाण आणि पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून न घेता परत पाठवल्याची माहिती उघड झाली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने न्याय मिळण्याच्या हेतूने ही संपूर्ण माहिती बच्चू कडू यांच्या नावे लिहून ठेवली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना मिळणार अतिरिक्त भत्ता!

ब्रिटनमधून दिल्लीत आले 7 हजार प्रवासी; प्रत्येकाचा घरी जाऊन सरकार करणार तपासणी

“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”

मुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या