बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

नांदेड | नांदेड येथील अवघ्या 14 वर्षाच्या मुलीने अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी करुन दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे ही मुलगी एका शेतकऱ्याची लेक आहे. या मुलीचं नाव रेवा दिलीप जोगदंड असं असून आपल्या अनोख्या कामगिरीने तिने नांदेडकरांची मान अभिमानाने वर केली आहे.

कोंढा येथील रहिवासी असणाऱ्या केशवराव बालाजी जोगदंड 20 वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले. त्याठिकाणी त्यांनी दोरीवर विमान उडवून दाखवण्याविषयी यशस्वी संशोधन केलं आहे. आपल्या वडिलांमुळे रेवाला देखील अगदी लहान वयापासूनच पायलट होण्याची इच्छा मनात येत होती.  यानंतर अवघ्या 14 व्या वर्षी तिनं आपलं पायलट होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

रेवा हिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत पायलट पदासाठी लागणाऱ्या संपूर्ण चाचण्या पार करून दि. 20 जून 2021 रोजी विमानाची यशस्वी भरारी घेऊन आकाशाला गवसणी घातली आहे. या अभिमानास्पद कामगिरीसाठी तिचे वडील दिलीप जोगदंड, आई वंदना दिलिप जोगदंड यांनी तीला सतत प्रोत्साहन दिले.

दरम्यान, मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलिकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. या शाही विवाह सोहळ्याची प्रसार माध्यमांतून मोठी प्रसिद्धी झाली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते.

थोडक्यात बातम्या-

पुढच्यावेळी पुणे- मुंबई महामार्ग उखडून टाकू- रविंद्र भेगडे

चिंता वाढली! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पुढेच

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराच्या अडचणीत वाढ!

…तर मी राजकीय संन्यास घेईल- देवेंद्र फडणवीस

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More