अकोला महाराष्ट्र

मोदींच्या 20 लाख कोटींमधून तुम्हाला काय मिळालं? काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला शेतकऱ्याचं खास उत्तर

अकोला | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कहां गये वोह 20 लाख करोड? या राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलल्या 20 लाख कोटींमधला आपल्याला काही फायदा झाला का? असा प्रश्न शेतकऱ्याला विचारल्यावर त्याने नकारार्थी मान डोलावली अन् त्यातली दमडीही आमच्या वाट्याला आली नाही, असं स्पष्ट सांगितलं.

20 लाख करोड पॅकेजमधून शेतकऱ्यांना काही मदत मिळाली की नाही याचा पर्दाफाश आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. शेतकऱ्याने दिलेल्या उत्तरानंतर मोदींनी जाहीर केलेली घोषणा किती पोकळ होती, याचा आज अनुभव आल्याचं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं.

युवकचे प्रवक्ते कपिल ढोके, अकोला युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे व अकोला शहर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंशुमन देशमुख यांनी अकोला येथील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजविषयी प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना शेतकऱ्याने मात्र आम्हाला आतापर्यंत एक छदाम देखील मिळाला नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्र युवक काँग्रेसने संबंधित व्हीडिओ ऑफिसिअल ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

‘मोदी सरकारने केलेली २० कोटींच्या पॅकेजची घोषणा किती पोकळ होती हे आता सिद्ध झाले आहे. एकाही घटकाला या पॅकेजचा लाभ मिळाला नाही. २० कोटींचे पॅकेज हा सुद्धा जुमलाच होता, हे आता सिद्ध झाले आहे. मग २० लाख कोटी रुपयांचे काय झाले? हे पैसे कुठे गेले? हे जनतेसमोर आले पाहिजे, असं युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.

छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली का, नोकरदारांच्या काय अडचणी आहेत, बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली ह्याचा पर्दाफाश युवक काँग्रेस करणार असून हया सर्वांच्या मागण्या व्हिडिओचित्रण करून व पंतप्रधान कार्यालयाला फोन करून व पत्र लिहून सरकारला जाब विचारणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘डिसेंबरपर्यंत भारताला कोरोनाची लस मिळणार’; अदर पूनावाला यांचा दावा

वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् रूग्णालयाने बापाच्या मृत्यूचा दाखला हाती दिला!

Lava ने लाँच केला खास Proudly Indian एडिशन…!

“तुझे फोटो पाठव ना…” चौकशी रियाची अन् फटका कोल्हापूरच्या तरूणाला; खळबळजनक घटना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या