‘भारत बंद’ दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी सांगितलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या शेतकरी मोर्चाने 27 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारलं आहे. या दरम्यान सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या बंदमध्ये अनेक राष्ट्रीय पक्षांचा तसेच संघटनांचा देखील समावेश आहे.

बंद दरम्यान दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्याचा मृत्यू ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला. तर मीडिया रिपोर्टनुसार मृत्यू मागील खरं कारण शवविच्छेदनानंतर समजेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांनी यावर केंद्र सरकारसोबत चर्चा केली आहे, तरी देखील यावर तोडगा निघाला नसून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे.

दरम्यान, बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. मात्र रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.

थोडक्यात बातम्या-

“अमित शहा म्हणजे ‘गजनी’, भाजपला गजनीसारखा झटका येतो”

दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी- विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अमित शहांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

आईच्या मृत्यूनंतर मुलांनी वडिलांसोबत मिळून बनवलं आईचं मंदिर!

Agriculture Ministercome forwardDelhidiscussFarmersfarmers protestLatest NewsMarathi NewsNarendra Singh TomarProtesttake backकृषी मंत्रीचर्चा कराताज्या बातम्यादिल्लीनरेंद्र सिंह तोमरनिषेधमराठी बातम्यामागे घ्याशेतकरीशेतकऱ्यांचा निषेधसमोर या