भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

अहमदनगर | कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका शेतकऱ्यानं मोफत कांदा वाटप केलाय. पोपटराव वाकचौरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील पुतनगावचे ते रहिवासी आहेत. त्यांनी आठवडे बाजारात मोफत कांदा वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केलाय.

मागच्या साडेचार वर्षांत आमच्या शेतीमालाला योग्य प्रकारे सरकारने भाव दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत, अशी उपरोधिक टीका त्यांनी सरकारवर केलीय.

दरम्यान, यावर बोलताना शेतमालाला मातीमोल भाव मिळतोय; शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हा प्रश्न देखील त्यांनी सरकारला विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

-…असे हल्ले गल्लीबोळातील नेत्यांवर होत असतात- प्रकाश आंबेडकर

-आता श्रीपाद छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल

-“दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा, पंतप्रधान मोदीही रस्ता बदलतात”

-कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं