हवामान विभागाविरोधात शेतकऱ्याची पोलिसांकडे तक्रार

Photo- reuters

बीड | बीडच्या माजलगाव तालुक्यातील आनंदगावचे शेतकरी गंगाभिषण थावरे यांनी हवामान विभागाविरोधात पोलिसात धाव घेतलीय. हवामान विभागाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय. 

हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे महागडे बियाणे घेऊन आपण पेरणी केली, मात्र आता पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली असून याला सर्वस्वी हवामान विभाग जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

दरम्यान, हवामान विभाग आणि बी-बियाणे कंपन्या यांनी आपल्या फायद्यासाठी प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन चुकीची वृत्तं प्रसारित केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आलाय. 

वाचा तक्रार अर्जाची प्रत-

beed1 - हवामान विभागाविरोधात शेतकऱ्याची पोलिसांकडे तक्रार

beed2 - हवामान विभागाविरोधात शेतकऱ्याची पोलिसांकडे तक्रार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या