सरकारच्या खोट्या जाहिरातीचा मनस्ताप, शेतकरी घर सोडून परागंदा!

पुणे | सरकारच्या खोट्या जाहिरातींमुळे एका शेतकऱ्यावर परागंदा होण्याची वेळ आलीय. शांताराम कटके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ‘थोडक्यात’ने 4 दिवसांपूर्वीच त्यांच्यासंदर्भात छापून आलेल्या खोट्या जाहिरातीची बातमी दिली होती.
पुरंदर तालुक्यातील शांताराम कटके ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत झळकले होते. त्यांना न विचारताच त्यांचा फोटो जाहिरातीत वापरल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना शेततळ्यासाठी मिळालेलं अनुदान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मिळाल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान, खोट्या जाहिरातीनंतर आपल्याला मनस्ताप होत असल्याचं शांताराम कटके यांनी सांगितलं होतं. आता दाराला टाळं लावून ते चक्क घर सोडून निघून गेलेत.