देशभरातून बळीराजा एकवटला, आता थेट राजधानी दिल्लीत धडक देणार

Photo- reuters

नवी दिल्ली | देशभरातील बळीराजा हमीभावासंदर्भात 20 नोव्हेंबरला राजधानी दिल्लीत धडक देणार आहे. संपूर्ण देशभरातील शेतकरी मोदी सरकारविरोधात एकवटणार आहे. यासाठी देशभरातील शेतकरी नेतेही एकवटले आहेत.

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादनाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजप सरकारनं दिलं होतं. मात्र हे आश्वासनं पूर्ण न केल्यानं देशभरातल्या शेतकऱ्यांकडून हे आंदोलन पुकारलं गेलंय.

वेगवेगळ्या राज्यातल्या शेतकरी नेत्यांची यासंदर्भात दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रातून या बैठकीसाठी राजू शेट्टी, मेधा पाटकर उपस्थित होते.