नवी दिल्ली | दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर गाझीपूरमध्ये शेतकरी आंदोलन संपण्याच्या मार्गावर होतं, मात्र तेवढ्यात एक घटना अशी घडली की शेतकरी मोठ्या संख्येनं पुन्हा या ठिकाणी दाखल झाले आणि या आंदोलनाला पुन्हा बळकटी मिळाली.
दिल्लीतील हिंसाचारानंतर यूपी पोलिसांनी गाझीपूरमधील आंदोलकांना नोटीस दिली होती, तसेच गुरुवारी संध्याकाळपर्यंत ही जागा खाली करण्यास बजावलं होतं. शेतकऱ्यांसुद्धा आवराआवर सुरु केली होती, काही शेतकरी तर निघून सुद्धा गेले होते.
रात्री पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी गोळी मारावी, पण मी इथून हलणार नाही, अशी भूमिका राकेश टिकैत यांनी घेतली. यावेळी राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले.
राकेश टिकैत भावुक झाल्याची आणि त्यांनी आमरण उपोषण सुरु केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हरियाणा तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनस्थळी जमा झाले. यामुळे या आंदोलनाला पुन्हा नव्याने धार आली आहे.
#WATCH| BKU leader Rakesh Tikait breaks down while speaking to media; said, “We will not go anywhere till action is taken against those who lathi-charged farmers.”(28.01) pic.twitter.com/welii1I5QY
— ANI (@ANI) January 28, 2021
थोडक्यात बातम्या-
…अन् शेतकरी नेत्यानं त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली ओढली, पाहा Video
रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटणार!
…शेवटी लेकाने पालिका मुख्यालायत आणलं; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक
‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल- संजय राऊत
“कृषी कायदे परत घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन”
Comments are closed.