Top News देश

…अन् शेतकरी नेत्यानं त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली ओढली, पाहा Video

गाझीपूर | प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण लागलं आहे. मात्र अशात घुसखोर असल्याचा आरोप करत भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी एका व्यक्तीच्या कानाखाली ओढली आहे.

संबंधित व्यक्ती व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी शेतकऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. राकेश टिकैत यांना संताप अनावर झाल्यावर त्यांनी या व्यक्तीच्या कानाखाली ओढली. या प्रकरणाचा व्हिडीओही समोर आला आहे.

दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर असलेल्या गाझीपूरमध्ये सुरु असलेल्या आंदोलस्थळी पोलीस फाटा मोठ्या संख्येनं दाखल झाला होता. आंदोलकांना घटनास्थळावरुन हटवण्यात येणार होतं, मात्र आंदोलकांनी यास नकार दिला.

कायदा मागे घेतला जात नाही तोवर हटणार नाही, असं आंदोलकांनी स्पष्ट केलं. दरम्यान, व्यासपीठावर घुसणारा भाजपचा घुसखोर होता. जे कोणी इथं वाईट हेतूनं आलं आहे त्यांनी निघून जावं, असं राकेश टिकैत यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटणार!

…शेवटी लेकाने पालिका मुख्यालायत आणलं; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक

‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल- संजय राऊत

“कृषी कायदे परत घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन”

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या